Free for download only on 4th and 5th March 2020

Monday, 1 February 2021

Budget

365 Days of Self Love


आज बजेट सादर झाले. मी MBA हि असल्याने माझं त्यावर expert opinion आहेच. पण नाही बोलणार त्या विषयी.

कारण मी तर आनंदाचं बजेट वर्षाच्या सुरवातीलाच मांडले आहे. कुठे गुंतवणूक करायची वेळेची, भावनांची, आणि कुठल्या ( व्यर्थ, नकारात्मक ) विचारांवर टॅक्स regime वाढवायचा अगोदरच ठरले आहे.

त्यामुळे बाहेर काही घडलं तरी आतलं आनंदाचं झाड काही बहराईचं थांबत नाही.

अर्थात शंभर टक्के ते पाळले जातेच असे नाही. जातो एखादा दिवस कुढत आणि बदलू न शकणाऱ्या गोष्टींच्या दगडांवर डोके फोडत. But it is absolutely fine.

एकतर budgeting मुळे थोडी फार, नाही बरीच, emotional wellness ची सवय नक्कीच लागते. एक insight येते. अर्थक आणि निरर्थक यातला फरक जो कळत होता, पण वळत नव्हता, थोडा तरी वळायला लागतो.

दुसरं महिन्यातून एखाद दोन दिवस मला उदास, मलूल वाटले तरी बाकी दिवस मस्तच गेलेले असतात.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे खाच खळग्याचे एक दोन दिवस मी जिवंत असल्याची जाणीव करून देतात. ज्या दिवशी मला असे काहीच वाटणार नाही, त्या दिवशी जीवनाची जानच गेली असेल. अपूर्णताच जगण्याचं कारण देत असते. नाही उमगत? परत सांगतो, अपूर्णताच जगण्याचं कारण देत असते.
जीना इसि का नाम है....

ता.क. काही मित्रांनी पोस्ट miss होतात. पुन्हा शोधणे अवघड जाते. सर्व पोस्ट एका ठिकाणी वाचायला मिळतील का असे विचारले. तर आज पासून मी maheshsowani.blogspot.com वर सुद्धा पोस्ट करेन. पोस्ट जरी miss झाली, तरी तुम्ही ह्या लिंक वर जावून सर्व पोस्ट वाचता येतील. आहे किनायाई मज्जा?


फोटो 
माझ्या टेरेसवरून काढला आहे 

एक  हि पोस्ट न miss करण्यासाठी शेजारी दिलेल्या  follow by email बटण वर क्लिक करा आणि रोजची पोस्ट आपल्या ई-मेल बॉक्स मध्ये.

No comments:

Post a Comment