Free for download only on 4th and 5th March 2020

Sunday 3 September 2023

अशी ही दादी, आणि असाच मी.

 


Alter ego या शब्दाचा मराठीत अर्थ सांगणे अवघडच. गुगल केले तर त्याने एक प्राण दोन शरीर असे मराठीत सांगितले. Alter ego म्हणजे हुबेहूब तुमची कॉपी म्हणता येईल. म्हणजे दिसण्यात नाही तर आवडी-निवडी, स्वभाव, react व्हायची पद्धत या बाबत.



माझा alter ego कोण म्हणाल तर badhai ho मधील दादी. कायम खरं बोलणारी. संबंध टिकावे म्हणून खोटे खोटे formal न बोलणारी. नात लग्न होऊन जाताना जेव्हा तिला म्हणते की आजी मी तुला परदेशात गेल्यावर फोन करेन, तेव्हा तिला भारतात असताना फोन करून काय उजेड पाडलास जे आता परदेशात गेल्यावर फोन करशील, असे तिथल्या तिथे सुनावणारी. बिचारा तिचा मुलगा band वाल्यांना band वाजवायला लाऊन विषय तिथेच संपवतो.



लग्न घरात, वातावरण बिघडेल हे माहित असून ही स्वतः च्या मुलीला व सुनेला दुसऱ्या सुनेच्या गरोदरपणाबद्दल टोमणे मारल्याबद्दल, लग्न झाल्यावर मुले होणारच, मुले काय सेक्स केल्याशिवाय आकाशातून पडतात का, पती पत्नीचे संबध काय चुकीचे आहेत का, असे विचारणारी. संस्काराची भाषा करणाऱ्या तुम्ही तरी तुमचे कर्तव्य कुठे पार पाडले, असे सुनावणारी. ती हे सुनवत असताना गरोदर सून बाहेर जाऊन नवऱ्याला 'अम्माजी फट पडी है.’ असे सांगून बोलावते. खरोखरच मी ही फट पडल्यावर अशीच आफत येत असणार माझ्या आजू बाजूच्या लोकांवर. पण नाते शाबूत ठेवायचे म्हणून काहीही ऐकायचे का, आणि नाते खरोखरच पक्के असेल तर खरे बोलले तर एवढे का लागावे? का बोललेले खरे असते म्हणूनच लागते?



पन्नाशीला आलेला मुलगा आता पुन्हा बाप बनणार आहे असे समजल्यावर त्यालाही दादी सुनावते. मी तर मागच्या पिढीची तरीही मला माहित आहे. पेपर मध्ये येते, टीव्ही वर सांगतात निरोध वापरा, तरी तुला हे कसे कळाले नाही. आणि हे सगळे करायला तुला वेळ कधी मिळाला. मी जरा माझ्या जवळ बस, बोल असे म्हणायचे तेव्हा तर म्हणायचास आज फार थकलो आहे. आणि हे करायला मात्र तुला बरा वेळ मिळाला.



एवढ्यावर न थांबता ती त्याला शेवटी तू तुझ्या बापाचाच मुलगा, असे ही म्हणते. आता काही लोकांना हे जरा अतीही वाटेल. पण ती आहे ही अशी.



दुसऱ्या एका प्रसंगात ती तिच्या मेलेल्या नवऱ्याचा उल्लेख करताना आधी परमेश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो असे म्हणते तर दुसऱ्याच वाक्याला त्या माणसाने एक शहाणपणाचे काम नाही केले आयुष्यात असेही म्हणते. पण तिला न सांगता करून आणलेल्या सुनेमुळे तिच्या म्हातारपणाची सोय झाली, परमात्म्याने त्याला सद्बुद्धी दिल्यामुळे एवढी चांगली सून आणली, असे म्हणून ती नवऱ्याच्या निर्णयाचे आणि सुनेचे कौतुक ही करते.



दादी मुळे अनेक संबध दुरावले असतीलही. आत्ता गप्प बसली असती दादी तर काय बिघडले असते. पण ती बसत नाही गप्प(आणि मी ही).



बरं ती बोलते ते चुकीचे ही नाही ना? ती काही कुणाला शिव्या शाप देत नाही. आहेत ती तथ्ये, आहे तशी ती मांडते. दुसरा जिथे बरोबर होता, तिथे ती चूकहोती आणि तो बरोबर असे मोठ्या मनाने कबूलही करते. तर अशी ही दादी, आणि असाच मी. तुमचा alter ego कोण आहे? #maheshwrites #marathi

No comments:

Post a Comment