Free for download only on 4th and 5th March 2020

Wednesday, 9 June 2021

Murder at the Kolkota Lanes - Book Review

 


If you are fan of murder mysteries like me, you will definitely like Asimava Roy Chaudhary’s Murder at the Kolkota Lanes.

 

Nita Saha ASP of Lake view police station is assigned the investigation of murder of business tycoon Arjun Mishra. As the investigation unfolds, a series of murders surface.

Nita has a hard time, reaching the culprits. There are several tense moments in the novel, where a chill runs down your spine. This I believe is the success of the author.

 

The book contains all the ingredients of a block-buster thriller. Nita’s back story is also interesting. All the characters in the novel are shaped very well. The backdrop of Kolkota makes the book scenic. I really loved meandering through the lanes of Kolkota. It certainly gives another dimension to the book.

 

I thoroughly enjoyed reading this book. Buy this book. You will certainly not regret buying it.

Friday, 5 February 2021

Chitta

 मी 365 Days of Self Love जेंव्हा सुरु केला तेंव्हा हा प्रोजेक्ट अतिशय पर्सनल होता. वाटलं नव्हतं तो इतक्या मनांना स्पर्शून जाईल असे.

एका पोस्ट मध्ये मी लिहिलेले होते कि ते दूरवर दिसणारं मंदिर मला जवळून पाहायचे आहे. परवा एका मित्राचा फोन आलातो ती पोस्ट वाचून, दूरवरून दिसणारे परंतु त्याने जवळून कधीहि पाहिलेले मंदिर पाहून आला, ते हि एकटा.

आपल्या समाजात एकटं राहणे तसं फारसं समाजमान्य नाहीच. पण एकटं राहणं, निदान काही काळ तरी, फारच आवश्यक आहेIntrospect करायला, स्वतःला समजून घ्यायला अन स्वतःवर प्रेम करायला काही काळ स्वतःला isolate करायलाच हवं. जसं बी जमिनीच्या अंधाऱ्या गर्भात गुडूप होऊन जाते, तसेच. तेंव्हाच कुठे कोम्ब फुटतो निर्जीव बीजाला.   एकटेपणातून  नवऊर्जा  मिळते सृजनतेची, जगाकडे नव्याने पाह्यची आणि ऑफ कोर्से जगण्याची.

आज प्रत्येक जण कुठे तरी अशांत आहे, आयुष्याच्या कुठल्या तरी aspect वर नाराज आहे. मीच माझ्यावर रुसलो आहे, कारण मी जगाला खुश करता करता स्वतःवर प्रेम करायला विसरलो आहे.
 

भारतीय समाज स्वतःवर प्रेम करण्यात जरा कंजुसच. का कुणास ठाऊक. पूर्वी नसावे असे कदाचित. प्राचीन मंदिरावरील कोरीवकाम, स्वतःचे रूप आरश्यात न्यहाळणाऱ्या, साज शृंगार करणाऱ्या स्त्रिया, नाच गाण्यात  आणि बऱ्याच कश्यात मश्गुल स्त्री पुरुष पाहून वाटते किती प्रेम होते ह्यांचे जीवनाच्या प्रत्येक गोष्टीवर.

 

आज तेच जमिनीखाली गडून गेलेले प्रेम उकरून पुन्हा वर काढायचे आहेवाळत चालेल्या झाडाला, थकत चाललेल्या गात्रांना आणि गोंधळून चालेल्या मनाला, चांगलं थाऱ्यावर आणायचे आहे.

 

#365DaysofSelfLove #marath #happiness.

Monday, 1 February 2021

Budget

365 Days of Self Love


आज बजेट सादर झाले. मी MBA हि असल्याने माझं त्यावर expert opinion आहेच. पण नाही बोलणार त्या विषयी.

कारण मी तर आनंदाचं बजेट वर्षाच्या सुरवातीलाच मांडले आहे. कुठे गुंतवणूक करायची वेळेची, भावनांची, आणि कुठल्या ( व्यर्थ, नकारात्मक ) विचारांवर टॅक्स regime वाढवायचा अगोदरच ठरले आहे.

त्यामुळे बाहेर काही घडलं तरी आतलं आनंदाचं झाड काही बहराईचं थांबत नाही.

अर्थात शंभर टक्के ते पाळले जातेच असे नाही. जातो एखादा दिवस कुढत आणि बदलू न शकणाऱ्या गोष्टींच्या दगडांवर डोके फोडत. But it is absolutely fine.

एकतर budgeting मुळे थोडी फार, नाही बरीच, emotional wellness ची सवय नक्कीच लागते. एक insight येते. अर्थक आणि निरर्थक यातला फरक जो कळत होता, पण वळत नव्हता, थोडा तरी वळायला लागतो.

दुसरं महिन्यातून एखाद दोन दिवस मला उदास, मलूल वाटले तरी बाकी दिवस मस्तच गेलेले असतात.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे खाच खळग्याचे एक दोन दिवस मी जिवंत असल्याची जाणीव करून देतात. ज्या दिवशी मला असे काहीच वाटणार नाही, त्या दिवशी जीवनाची जानच गेली असेल. अपूर्णताच जगण्याचं कारण देत असते. नाही उमगत? परत सांगतो, अपूर्णताच जगण्याचं कारण देत असते.
जीना इसि का नाम है....

ता.क. काही मित्रांनी पोस्ट miss होतात. पुन्हा शोधणे अवघड जाते. सर्व पोस्ट एका ठिकाणी वाचायला मिळतील का असे विचारले. तर आज पासून मी maheshsowani.blogspot.com वर सुद्धा पोस्ट करेन. पोस्ट जरी miss झाली, तरी तुम्ही ह्या लिंक वर जावून सर्व पोस्ट वाचता येतील. आहे किनायाई मज्जा?


फोटो 
माझ्या टेरेसवरून काढला आहे 

एक  हि पोस्ट न miss करण्यासाठी शेजारी दिलेल्या  follow by email बटण वर क्लिक करा आणि रोजची पोस्ट आपल्या ई-मेल बॉक्स मध्ये.