मी 365 Days of Self Love जेंव्हा सुरु केला तेंव्हा हा प्रोजेक्ट अतिशय पर्सनल होता. वाटलं नव्हतं तो इतक्या मनांना स्पर्शून जाईल असे.
एका पोस्ट मध्ये मी लिहिलेले होते कि ते दूरवर दिसणारं मंदिर मला जवळून पाहायचे आहे. परवा एका मित्राचा फोन आला. तो ती पोस्ट वाचून, दूरवरून दिसणारे परंतु त्याने जवळून कधीहि न पाहिलेले मंदिर पाहून आला, ते हि एकटा.
आपल्या समाजात एकटं राहणे तसं फारसं समाजमान्य नाहीच. पण एकटं राहणं, निदान काही काळ तरी, फारच आवश्यक आहे. Introspect करायला, स्वतःला समजून घ्यायला अन स्वतःवर प्रेम करायला काही काळ स्वतःला isolate करायलाच हवं. जसं बी जमिनीच्या अंधाऱ्या गर्भात गुडूप होऊन जाते, तसेच. तेंव्हाच कुठे कोम्ब फुटतो निर्जीव बीजाला. एकटेपणातून नवऊर्जा मिळते सृजनतेची, जगाकडे नव्याने पाह्यची आणि ऑफ कोर्से जगण्याची.
आज प्रत्येक जण कुठे तरी अशांत आहे, आयुष्याच्या कुठल्या तरी aspect वर नाराज आहे. मीच माझ्यावर रुसलो आहे, कारण मी जगाला खुश करता करता स्वतःवर प्रेम करायला विसरलो आहे.
भारतीय समाज स्वतःवर प्रेम करण्यात जरा कंजुसच. का कुणास ठाऊक. पूर्वी नसावे असे कदाचित. प्राचीन मंदिरावरील कोरीवकाम, स्वतःचे रूप आरश्यात न्यहाळणाऱ्या, साज शृंगार करणाऱ्या स्त्रिया, नाच गाण्यात आणि बऱ्याच कश्यात मश्गुल स्त्री पुरुष पाहून वाटते किती प्रेम होते ह्यांचे जीवनाच्या प्रत्येक गोष्टीवर.
आज तेच जमिनीखाली गडून गेलेले प्रेम उकरून पुन्हा वर काढायचे आहे . वाळत चालेल्या झाडाला, थकत चाललेल्या गात्रांना आणि गोंधळून चालेल्या मनाला, चांगलं थाऱ्यावर आणायचे आहे.
#365DaysofSelfLove #marath #happiness.