माझ्या दोन बाल मैत्रिणी. अगदी शाळेत ही जात नव्हतो तेंव्हा पासून आम्ही खेळायचो. घरे ही अगदी जवळ जवळ. लहानपणी तासंतास सोबत खेळलेलो आम्ही. मग शाळा वेगळ्या झाल्या, भेटी कमी होऊ लागल्या. आम्ही पुन्हा अकरावी, बारावीत एकत्र आलो. आता मैत्री तर दूर साधे बोलायच्या पण नाहीत. बारावी नंतर पुन्हा दुरावलो. मग पुन्हा कॉलेज मध्ये असताना भेट झाली आमची अगदी अनपेक्षित. मी आणि माझी कॉलेज मधील मैत्रीण (x म्हणू तिला) एक सिनेमा बघायला गेलो. आमच्या सीट्स शेजारीच माझ्या त्या दोन मैत्रिणी आणि अकरावी बारावीतल्या मुलींचा ग्रुप होता. मी बोललो माझ्या मैत्रिणीशी. पण त्यांचा रेस्पोंस एकदम थंड. x मला म्हणाली तुझ्या बाल मैत्रिणी तर बोलत देखील नाहीत तुझ्याशी. माझे वय तेंव्हा १८ होते. जरा गोंधळलेलाच होतो मी. रूढार्थाने यशस्वी होतो तरी. कदाचित माझ्या बावळ्यापणा मुळे चार चौघात लहानपणीचा मित्र म्हणून मला acknowledge करायची भीती वाटली असेल का माझ्या त्या मैत्रिणींना. आज मला इतक्या वर्षांनी त्या परत कुठे भेटल्या तर तश्याच वागतील का? का आता झाल्या असतील शहाण्या? का माझे आता त्यांच्याशी वागणे बदलेल. माहित नाही. पण यश, दिसणे, पैसा, प्रतिष्ठा, आणि समाजाने घालून दिलेल्या त्यांच्या व्याख्येत बसणे खरेच इतके महत्वाचे असते का? आणखी एका कॉलेज मधल्या मित्राने मला परवा सहज मला किती पगार विचारले. मी ही खरा आकडा सांगितला. ‘म्हणजे तू जीवनात यशस्वी ठरलास.’ तो म्हणाला. हो पैसा जगण्यासाठी आवश्यक आहेच. पण अमुक एक रक्कम कमावली कि यशस्वी नाहीतर अयशस्वी हा काय प्रकार? होय मी लिखाण, अध्यात्म यात यशस्वी आहे. बाकी बऱ्याच गोष्टीबाबत अजून गोंधळलेलाच आहे. आपण सगळेच असतो असे. पण म्हणून यशस्वी आणि अयशस्वी असे tags लावून एखाद्या ढिगातून कोवळ्या भेंड्या उचाल्रून घेवून, जून भाजी आपण reject करतो तसे माणसांनाही करायचे? #365daysofselflove
Short stories, poems, book reviews, travelogues and everything that touches the heart.
Free for download only on 4th and 5th March 2020
Saturday, 29 October 2022
Monday, 19 September 2022
Sat Varshe Sakt Majuri...? सात वर्षे सक्तमजुरी Book Review
Dr. Sherali Shaikh's Marathi book titled 'Sat Varshe Sakt Majuri...?' is an interesting read for sure. This autobiographical book primarily focuses on the seven years which he spent in the hinterlands of Nandurbar.
The book begins with the authors transfer to a remote location posting, and his attempts, albeit unsucessful, in getting it changed. Reluctantly he joins the posting. The challenges are multiple. The transport options are limited. There is no separate residential facility. The staff huddles up in the godown like structure of the health centre. Electricity is unheard of. The dialect which most of the staff and all the patients speak is Greek and Latin for the author. Yet, he overcomes all these challenges and becomes a sought after surgeon in the district. Through out the book the author tries to analyse whether this remote posting was a blessing or a punishment.
A class one gazetted posting appears to be a plump position for the world. But the picture isn't rosy. The author is denied a rented house for his religion. There is constant uncertainty coupled with a regret of having made a wrong choice of becoming a medical officer. The author has been very honest in wording all these human emotions.
He describes how he completed his education in adverse circumstances. He says that the adolescent age is very challenging for every person, no matter if he is good at studies or not. I feel this is the kind of sensitivity required for dealing with persons of this age group. I wish more was written about this part of his life, particularly how he acquired a command over the English language.
The author was selected to be a part of the medical team to be deputed to Haj to treat the Indian pilgrims. This forms the most interesting part of the book, and is a treat to read.
We all know that the full form of M.B.B.S is Bachelor of Medicine and Surgery. But how many M.B.B.S doctors we know conduct surgeries? The book underlines this dearth of surgeons in the rural parts of the country. Rather it tells us that there are qualified surgeons but for some unknown reasons they do not conduct surgeries. I wish the author had described in short the procedure of surgery. It would have helped in knowing how at times thirty surgeries were carried out in a day. Also, he should have told as to how there is so much of awareness about family planning in the most underdeveloped parts of the state.
What I liked about the book is that the author comes across as a simple person and not a superhero. As a result neither he, nor his book is error free. I did not like the way he has glorified drinking and eating gutka. Mere reference to these habits is one thing and glorifying them is another. At one place he even refers to drinking as national programme. Also he laughs at the trans person who in a very dignified way comes to say him off. This is cruel and insensitive. Not at all expected from a member of medical fraternity.
Yet, the book is an interesting read. It is enjoyable, and at the same time throws light on the system, something which doesn't always happen. The book is highly recommended.
Friday, 3 June 2022
sologamy
Sologamy वरील एक लिंक मी share केली तर त्यावर हे विचित्र आहे, अनैसर्गिक आहे अशा प्रकारच्या comments आल्या. तर गुजरात मधील एका महिलेने स्वतःशीच विवाह करायचा ठरवला आहे. असा विवाह म्हणजे sologamy. या लग्नात ती स्वतःच स्वतःला वचने देणार आहे. प्रत्येक प्रसंगात, सुख दुखात स्वतःची साथ देण्याची. कायम स्वतःमागे स्वतःच भक्कम पणे उभे राहण्याची.
मला ही कल्पना फारच आवडली. ‘पण आपण सतत स्वतः सोबत असतोच कि.’ एक मित्र म्हणाला.
पण माझा प्रश्न असा कि आपण खरंच स्वतः सोबत असतो का? उत्तर नाही. आपण सतत अपेक्षांचे ओझे वहात फिरतो. ह्याने माझे हे काम करावे. त्याने मला सन्मानाने वागवावे. कठीण प्रसंगी ह्याने माझी साथ द्यायला हवी होती, ती त्याने दिली नाही. म्हणून दुखः, त्यातून येणारी कटुता. कित्येक वेळा ही दुभंगलेली मने शेवट पर्यंत जुळतच नाहीत. मृत्यू माणूस घेवून जातो, पण कटू आठवणी मनात घर करून राहतात. हा माझ्याशी असे असे वागला, असं त्या माणसाच्या मृत्युनंतर कैक वर्षांनी सुद्धा लोकांना म्हणताना मी ऐकलेले आहे.
मी माझे आई-वडील, भाऊ-बहिण, पती, पत्नी, मुले ह्यांच्या कडून अपेक्षा नाही करणार तर कोणाकडून करणार, असे ही म्हणणारे लोक भेटले. अगदी मलाही काही दिवसांपर्यंत असेच वाटत होते. अपेक्षा बांधून पूर्ण कधीच होत नव्हत्या. पदरी येत होती ती निराशाच.
पण ही sologamy concept मला फारच आवडली. कशाला हवी ही अपेक्षा कि कोणी माझ्या मदतीला यावे, कोणी आधार द्यावा, कोणी माझे काहीतरी करावे.
स्वतःच रोज स्वतःशी वायदा करावा, मी आहे तुझ्यासाठी. काहीही झाले, तरी मी आहे तुझ्या पाठीशी. तू एकटा कधीच पडणार नाहीस कारण तूच तुझ्यासोबत सदैव राहण्याची शपथ घेतली आहेस.
राहता राहिला प्रश्न नैसर्गिक आणि अनैसर्गिक असण्याचा मला सांगा निसर्गात कोणता प्राणी pressure cooker वर अन्न शिजवतो, कोण कपडे घालतो, गाड्या उडवतो, mobile वापरतो? हे सगळे नैसर्गिक आणि कोणी स्वतःच स्वतःची साथ द्यायची ठरवले तर अनैसर्गिक? कमालच आहे बुवा. पण स्वतःच स्वतः सोबत स्वतःच्या निर्णयाच्या पाठीशी राहायचे म्हंटले म्हणजे अश्या टीकेची पर्वा कोणाला?
#365daysofselflove #sologamy #marathiTuesday, 24 May 2022
सुटत काहीच नाही
जंगलातून, दिव्य महात्म्यांच्या सहवासात काही चमत्कार घडतात का? असा प्रश्न कुणीतरी विचारला. आज मी जिवंत आहे, माझे श्वास चालू आहेत. मी हिंडू फिरू शकतो, मस्त मजेत. बस, याहून मोठा चमत्कार कोणता हवा? जेंव्हा माझे काही मित्र जे अकाली निघून गेलेले आहेत, तेंव्हा हा चमत्कार अजूनच अधोरेखित होतो.
आमच्या चित्पावनी भाषेत कोणी वारले हे सांगण्यासाठी अमका तमका पुढे गेला, असे सांगण्याची पद्धत आहे. तो पुढे गेला, काही काळाने आपणही त्याला जॉईन होणार आहोत, म्हणून पुढे गेला असे म्हणायचे.
आपणही ही एक दिवस जाणार आहोत, आपल्या कडे ही वेळ मर्यादित आहे ही जाणीव असणे हा ही एक चमत्कारच आहे. मग समजते आयुष्यात कशाला महत्व द्यायचे आणि कशाला नाही ते. वेळेचा सदुपयोग तेंव्हाच खरा करता येतो.
रानावनात फिरतो ते बाहेरील चमत्कार पाहण्यासाठी नाही तर आत डोकावून पाहण्यासाठी. तसे तर रोजच, प्रत्येक क्षणी आत डोकावून पहिले पाहिजे, तेंव्हा कुठे रानावनातील निरव शांततेत तुम्हाला खोल आत पाहता येईल. नाहीतर मग mobile वर गाणे लाव, कुणाला तरी फोन लाव असे सुरु होते. जसे काही मिनिटांच्या world record साठी खेळाडू रात्रंदिवस सराव करत असतो, तेंव्हा कुठे तो त्या लेवेल च्या स्पर्धेत उतरू तरी शकतो, अगदी तसेच. रोजचा सराव असेल, तरच एकांतात, दिव्य स्थानात काही तरी मिळते.
काही जण म्हणतील आम्हाला नको चमत्कार. आम्हाला तर ही सगळी कटकट सोडून निघून जायचे आहे दूर कुठे तरी. म्हणजे शांती लाभेल जरा. सांग ना एखादा आश्रम.
भगवा चोला घातला म्हणजे काही सर्वज्ञान झाले असे नाही. ते दिव्य महात्मे सुद्धा अगदी आपल्यासारखे धडपडत असतात, चुकत चुकत शिकत असतात. प्रपंचाच्या विवंचना, सगळे सोडून दिले असले तरी, त्यांना ही असतात.
मागे एका खूप मोठ्या साधूने मला एका निर्जन स्थळी नेवून तो आश्रमासाठी घेवू इच्छित असलेली जागा मला दाखवली होती. तो मला उत्साहाने सगळे सांगत होता, दाखवत होता. त्याच्या डोळ्यात तेच भाव होते जे एका नवीन घर घेणाऱ्या जोडप्याच्या असतील.
आणखी एका साधूला अरण्यातील त्याच्या कुटीचे बांधकाम कधी पूर्ण होणार याची विवंचना होती. झाले असे कि त्याचे गुरूंचे शरीर पूर्ण झाले. याला त्यांचे सगळे दिवस कार्य करावे लागले. सगळ्या साधूंना अशा वेळी बोलवावे लागते, भंडारा करावा लागतो आणि मोठी दक्षिणा द्यावी लागते.
‘भंडारा चे काही नाही. कितीही लोकांना घालीन जेवायला. पण दक्षिणेत खूप पैसा खर्च होतो.’ तो म्हणाला. त्याचे सारे planning गुरूंच्या निधनाने बिघडले होते.
एका नदी किनाऱ्यावर असलेल्या आश्रमातील साधूंना बोअर मारायचे होते. पावसाळ्यात नदीचा रस्ता निसरडा होतो आणि पाणीही गढूळ. त्यांनी forest ranger ला ही पटवले होते. हे काम म्हणजे जंगलातील अतिक्रमण. Forest rangers अनेकवेळा त्यांना आश्रम बनवण्यापासून रोखतात. त्यांचे कामच ते असते. पण साधूही काही कच्च्या गुरुचे चेले नसतात. तेही पटवतात ह्यांना. तर ह्या साधूंनी पटवले ranger ला. काम बेकायदेशीर असल्याने रात्रीच्या वेळेसच करायचे होते. अशा बेकायदेशीर कामांना कामगार double rate घेतात. साधुबाबांची पैश्यांची जुळणी कमी पडत होती. मला म्हणाले देशील का काही हजार. Ranger राजी आहे तोवर काम उरकायला हवे.
माझे लक्ष समोरील hand pump कडे गेले. नुकताच एक भक्त त्यावरून पाणी भरून घेवून आला होता. मी म्हटले महाराज समोरच pump आहे, पुन्हा दुसरा कशाला? तर महाराज म्हणाले, ‘अरे तो दुसर्या साधूचा आहे. कधी तरी एकाद दोन बादल्या पाणी आणणे वेगळे. आपल्याला नको का स्वतंत्र hand pump?’
दुसर्या एका आश्रमात रात्री जेवण झाल्यावर ते गुरु माझ्याशी गप्पा मारत असताना, आतून शिष्याने विचारले. ‘गुरुजी, दूध खूप उरले आहे. दही लावू का?’ गुरुजी अर्थात हो म्हणाले. पण जंगलात जावूनही ह्यातून सुटका नाही याचे मला हसू आले.
साधूंचे एक मंडळ असते. म्हणजे एक संघटनाच म्हणू. अर्ज देवून त्याचे सदस्य व्हावे लागते. अर्जावर फोटो लावेलेला असतो. स्वताचे व गुरुचे नाव असते. सदस्यता शुल्क असते. मी पाह्लेल्या मंडळात प्रत्येकी एक हजार रुपये शुल्क होते.
त्याही पुढे सदर मंडळात मतदान होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोष अधिकारी आणि सचिव निवडले जातात. मला भेटलेले साधू महाराज कोष अधिकारी होते. मोठ्या प्रेमाने मला सगळे दाखवत आणि सांगत होते.
चित्रकूट येथील राघवदास महाराज मोठा अवलिया माणूस. वय सत्तर च्या आस पास. तोंडात फक्त पुढचे दोन शोभेचे दात. अंगावर फक्त एक लंगोटी आणि तोंडभर हसू. एका रणरणत्या दुपारी त्यांच्या झोपडी वजा आश्रमात खाटेवर पडल्या पडल्या मला म्हणाले होते. ‘वाटले होते, इथे आल्यावर सगळे सुटेल. पण छे सुटत काहीच नाही.’
टिप- मी काढलेला हा फोटो माझा सगळ्यात आवडता आहे. तो साधू तेथे बसला होता मस्त composition जमून आले. स्थान अर्थातच गुप्त.