Free for download only on 4th and 5th March 2020

Saturday, 29 October 2022

माझ्या दोन बाल मैत्रिणी

माझ्या दोन बाल मैत्रिणी. अगदी शाळेत ही जात नव्हतो तेंव्हा पासून आम्ही खेळायचो. घरे ही अगदी जवळ जवळ. लहानपणी तासंतास सोबत खेळलेलो आम्ही. मग शाळा वेगळ्या झाल्या, भेटी कमी होऊ लागल्या. आम्ही पुन्हा अकरावी, बारावीत एकत्र आलो. आता मैत्री तर दूर साधे बोलायच्या पण नाहीत. बारावी नंतर पुन्हा दुरावलो. मग पुन्हा कॉलेज मध्ये असताना भेट झाली आमची अगदी अनपेक्षित. मी आणि माझी कॉलेज मधील मैत्रीण (x म्हणू तिला) एक सिनेमा बघायला गेलो. आमच्या सीट्स शेजारीच माझ्या त्या दोन मैत्रिणी आणि अकरावी बारावीतल्या मुलींचा ग्रुप होता. मी बोललो माझ्या मैत्रिणीशी. पण त्यांचा रेस्पोंस एकदम थंड. x मला म्हणाली तुझ्या बाल मैत्रिणी तर बोलत देखील नाहीत तुझ्याशी. माझे वय तेंव्हा १८ होते. जरा गोंधळलेलाच होतो मी. रूढार्थाने यशस्वी होतो तरी. कदाचित माझ्या बावळ्यापणा मुळे चार चौघात लहानपणीचा मित्र म्हणून मला acknowledge करायची भीती वाटली असेल का माझ्या त्या मैत्रिणींना. आज मला इतक्या वर्षांनी त्या परत कुठे भेटल्या तर तश्याच वागतील का? का आता झाल्या असतील शहाण्या? का माझे आता त्यांच्याशी वागणे बदलेल. माहित नाही. पण यश, दिसणे, पैसा, प्रतिष्ठा, आणि समाजाने घालून दिलेल्या त्यांच्या व्याख्येत बसणे खरेच इतके महत्वाचे असते का? आणखी एका कॉलेज मधल्या मित्राने मला परवा सहज मला किती पगार विचारले. मी ही खरा आकडा सांगितला. ‘म्हणजे तू जीवनात यशस्वी ठरलास.’ तो म्हणाला. हो पैसा जगण्यासाठी आवश्यक आहेच. पण अमुक एक रक्कम कमावली कि यशस्वी नाहीतर अयशस्वी हा काय प्रकार? होय मी लिखाण, अध्यात्म यात यशस्वी आहे. बाकी बऱ्याच गोष्टीबाबत अजून गोंधळलेलाच आहे. आपण सगळेच असतो असे. पण म्हणून यशस्वी आणि अयशस्वी असे tags लावून एखाद्या ढिगातून कोवळ्या भेंड्या उचाल्रून घेवून, जून भाजी आपण reject करतो तसे माणसांनाही करायचे? #365daysofselflove