निवाला मी मारत वगैरे नाहीच. तिच्या आईचा हात चालतो. पण त्यास माझा कट्टर विरोध आहेच. वयोमानाप्रमाणे निवाला सध्या अखंड खेळायचे किंवा tv बघायचा असतो. त्या मुळे होस्टेल ला ठेवीन. तिथे सगळी कामे स्वतःची स्वतःलाच करायला लागतात. फक्त रविवारी एकच दिवस TV बघयला मिळतो. वगैरे वगैरे मी सध्या सांगत असतो.
आज असेच तासानंतर TV मी बंद केला. तिला अर्थात राग आला जो तिने जोरात हुं… म्हणून व्यक्त केला.
'अपर्णा रामतीर्थकर म्हणायच्या की लहान असताना वडिलांचा धाक, तरुणपणी नवऱ्याचा धाक आणि आजीच्या वयात कर्त्या मुलाचा धाक असलाच... पाहिजे.’ मी म्हणालो.
‘धाक म्हणजे सगळं तुझं ऐकायचे असे का?’ तिने विचारले. मी हो म्हणाल्यावर म्हणाली, ‘काय स्वातंत्र्य वगैरे आहे की नाही मला?’
संविधान दिना दिवशी हे ऐकून मला काय बरं वाटलं म्हणून सांगू. हवा एवढा TV बघायचे स्वातंत्र्य तिला मिळायचे तेव्हा मिळेल. बाप म्हणतो म्हणून, नवरा म्हणतो म्हणून, मुलगा किंवा अन्य कोणी म्हणते म्हणून ही पोट्टी काही करणार नाही. योग्य पेरलंय, आणि ते अपेक्षे प्रमाणे वाढते आहे.
‘उद्या मिरे वाटणार आहे तुझ्या डोक्यावर.’ माझी एक दुष्ट मावशी काही वर्षा पूर्वी म्हणाली होती. म्हणावे वाटत होते, तुझ्या शब्दा बाहेर नसणाऱ्या मुलाने तुला न जुमानता त्याच्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलीची लग्न केलेच की! तेव्हा नाही का मिरे वाटले गेले तुझ्या डोक्यावर.
खरे तर प्रत्येकाच्या डोक्यावर मिरे वाटलेच गेले पाहिजेत. जरा डोक्याला झिणझिण्या आल्या की तरी मेंदू काम करेल, विवेक जागा होईल आणि स्वतंत्र विचार जन्माला येईल. #maheshwrites