Free for download only on 4th and 5th March 2020

Friday 20 September 2024

Chapter one Shiva Parvati

 

नाही होय करत शेवटी घरातून निघालोच. वाटेत पावसाने गाठलेच.

शी! उगाच तू व्हीलर घेतली. फोर व्हीलरच घ्यायला हवी होती. पण ट्राफिक.’

जरा पुढे गेल्यावर पाऊस थांबला. सिग्नलला अनेक चारचाक्या लागलेल्या. मी त्यांच्या बाजूने माझी गाडी पुढे नेली. ‘बरं, झालं टू व्हीलरच आणली.’ मी स्वतःशी म्हणालो. निर्णय घेण्याचा माझा हा गोंधळ नेहमीचाच.



कार्यक्रम कुठे आहे?’ असे गेट वरील वाचमनला विचारले.

सरळ जाऊन उजवीकडे.’ तो म्हणाला. खरंतर मला चार लोकांत जायची भीती. पण हा कार्यक्रम माझ्या आवडत्या लेखकाचा. एकलकोंड्या माणसांचा छंद पुस्तके वाचणे. मी ही त्याला अपवाद.

सरळ जाऊन उजवीकडे गेल्यावर बऱ्याच गाड्या लावलेल्या दिसल्या. टू व्हीलर्स रस्त्याच्या उजव्याबाजूला, तर फोर व्हीलर्स, रस्त्याच्या डाव्या बाजूला खेटून एका मागे एक लावलेल्या.

मला इतकी खेटून गाडी लावता येत नाही. बरे झाले टू व्हीलरच आणली.’ मी परत स्वतःलाच म्हणालो. 'मी ही अशी गाडी लावली तर कुणाला गाडी काढताना त्रास तर नाही होणार?’ नेहमी स्वतःला दुय्यम लेखायची सवय का दुसऱ्याच्या नजरेत चांगले बनण्याची केविलवाणी धडपड का आपल्या मुळे कुणाला तसूभरही त्रास होऊ नये ही प्रामाणिक भावना का या सगळ्यांचे मिश्रण. हा गोंधळ का माझ्याच डोक्यात. ह्या सगळ्यामुळे मी फारसे बोलत नाही. पण त्याचा मला फायदाच होतो. लोक मला विचारवंत वगैरे समजतात. जिजस जोशी. गोंधळ हा केवळ स्वभावात नाही तर नावातही. मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा खूप अशक्त होतो. दवाखान्याच्या खिडकीतून एक चर्च दिसायचे. आजीने म्हणजे माझ्या वडिलांच्या आईने मनोमन त्या चर्च मधल्या देवाला नवस बोलला हे मुल जर का ठणठणीत झाले तर तुझे नाव ठेवेन याला. माझ्या आयुष्याची दोरी बळकट होती. मी तरलो. दणक्यात बारसे करण्यात आले. अर्थात माझे नाव चर्चेचा विषय ठरले. माझ्या आईला नाव अजिबात आवडले नव्हते. ब्राह्मणाच्या घरात असले कसले क्रिस्ती नाव! तिच्या मते मला शंकराने वाचवले होते. त्यासाठी तिने सोळा सोमवार मागूनही घेतले होते. यथावत सोमवार झाले, उद्यापन झाले. दोन वर्षांनी माझे नाव ठेवणारी आजी गेली मात्र माझे नाव मात्र तसेच राहिले. मला शाळेत घालताना खरंतर माझ्या आईला माझे नाव बदलता आले असते पण तिने ते बदलले नाही. का बरं नसेल बदलले ते तिने? देवाच्या कोपाची भीती वाटली असेल का? कशाला उगाच विषाची परीक्षा? मुलगा शंकराच्या कृपेने तगला असला तरी हलाहल प्यायला तो काही शंकर नाही ना! म्हणजे ही माझी भीती काही अंशी का असेना पण अनुवांशिक होती तर.



पाऊस पडला होता. ग्राउंडवर बऱ्यापैकी चिख्खल झाला होता. त्यातून वाट काढत मी हॉलपर्यंत पोचलो.

मोबाईल बघितला. त्यावर दोन मिस काल पडलेले. त्यापैकी एक नंबर अनोळखी. दुसरा रामचा. True caller वर नाव पहिले. शर्मिला. ही तर बॉस च्या boss ची पी ए. हिने कशाला फोन केला असेल. मी तिला लगेच फोन लावला. पण लागला नाही. परत लावला तरी तेच.

ये, वेलकम.’ म्हणत रामने माझे स्वागत केले. ‘मला खात्री होती तू येशीलच.’ मी धन्यवाद म्हणत त्याचा हात हातात घेणार इतक्यात मागून एक मध्यम वयीन स्त्री पुढेल. राम तिला म्हणाला होता तर. नाहीतरी त्याची माझी काही ओळख नाही. तो माझा आवडता लेखक असला तरी. राम त्या बाईला घेऊन आत गेला.

मी हॉल मधील मागच्या खुर्चीत बसायला लागलो तर रामने मला उठवून पुढच्या ओळीत बसवले. ‘सर पुढे बसा प्लीज.’ राम म्हणाला. मी आणखीनच अवघडून गेलो. का होते मला हे असे? आता मी ही कुणीतरी आहे. मोठ्या पदावर आहे. पंधरा वर्षे नोकरीत आहे. तरीही. अजूनही लहानपणीचे प्रसंग का माझी साथ सोडत नाहीत. का मीच त्यांना सोडत नाही? ‘म्हणजे काय उशिरा येणारी मंडळी मागे बसू शकतात. डिस्टर्ब होत नाही.’ तो म्हणाला. मी घड्याळ पहिले. अजून तास भर होता कार्यक्रम सुरु व्हायला. मी नेहमीप्रमाणे उशीर नको व्हायला म्हणून लवकर येऊन बसलेला. काय झाले असते उशीर झाला असता तर? पण नाही मी आणि उशीर शक्यच नाही. माझ्या डी एन ए मध्येच होते. वेळेवर जाणे नाही तर वेळेच्या अगोदर जाणे. मुलाखत छान रंगली. शेवटी प्रेक्षकांनाही प्रश्न विचारायची संधी दिली. माझ्या अगदी जीभे पर्यंत प्रश्न आला पण तो मला शेवट पर्यंत विचारता आला नाही. तो विचारावा ह्या विचाराने माझ्या छातीत धडधड होऊ लागली आणि मला घाम सुटला.

***

नवीन कपडे शिवायला टाकायचे होते. माझा नेहमीचा टेलर म्हणाला तुम्ही नोवेल्टी समोर येऊन थांबा. कपडा पसंत करू. मी तुम्हाला पन्हा पाहून नेमके सांगतो.

बराच वेळ रस्त्यावरत्याची वाट पाहत थांबलो होतो. उगाचच अस्वस्थ वाटत होते. दुकानाच्या समोर गाडी लावली होती. खरंतर खूप टू व्हीलर्स लावलेल्या होत्या तिथे. तरीही दुकानासमोर गाडी लावली म्हणून दुकानदार ओरडेल काय, अशी मनात उगाचच भीती. रेल्वेत रिझर्वेशन असतानाही माझ्या जागेवर कोणी बसले असेल तर त्याला उठ कसे म्हणू याची भीती. आणि तो उठला नाही तर? टी सी ला कुठे शोधू?

छातीत दुखले तर हार्ट attack तर येणार नाही ना याची भीती

भीती भीती कधी ह्या भीतीने मनाचा ताबा घेतला. लहानपणी? चूक नसतानाही शाळेत सरांनी मारले तेव्हा. शेजारच्या काकूंनी त्यांच्या मुलाची बाजू घेत मला रागावले तेव्हा. माझ्या आई वडिलांनी मुलांच्या भांडणात मोठ्यांनी पडायचे नाही असे सांगितले तेव्हा?

का मला सतत असे बेचैन वाटते. दुकानात, बस मध्ये समोरच्या माणसाकडे सुट्टे पैसे दिसत असतनाही, तो सुटते परत देत नाही तेव्हा का नाही म्हणावे वाटत की आहेत ना सुट्टे पैसे तुमच्या कडे द्या माझे मला? का म्हणत नाही मी असे?

मी विनाकारण का तणावाखाली असतो? अनेक पुस्तके वाचूनही का मला सतत भीती वाटते.

कशाची भीती वाटते?

कोणी काही तरी म्हणेल याची.

आणि कोण काय म्हणाले तर काय होईल?

माझे अस्तित्व धोक्यात येईल. बाकीचे मला हसतील.

आणि त्यांनी हसले तर काय होईल

मी चार चौघांसारखा नाही.

नाहीच आहेस तू चार चौघांसारखा. तू आहेस वेगळा. आणि म्हणूनच नाही बसलास त्या रांगेत. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. तू एक राजहंस.

बरं ही भीती काही एकदम संपणार नाही हं. हळू हळू संपेल.



घरी आलो तर नेहमीप्रमाणे मोठ्या आवाजात टी व्ही चालू. सर्व खोल्यातील लाईट पंखे चालू. राही तिच्या खोलीत. तिची आई माझी पत्नी माधवी बेडरूम मध्ये लोळत पडलेली. मी आलो काय गेलो काय या घराला माझे काही नाही. माझा पैसा तेवढा यांना उधळायला हवा. आता माझा पैसा हा काही वेगळा नाही. त्यांच्यासाठीच तर आहे सगळे. पण मी ज्या खोलीत असता त्याच खोलीतील लाईट पंखा चालू ठेवा, बाकीचे बंद करा म्हटले तर माझे काही चुकले का? पण नाही. माझे कुठेच काही चालत नाही. ना घरात ना ऑफिस मध्ये. ऑफिस मध्ये मी साहेब पण हाताखालच्यांची युनियन strong. त्यांनी कसेही वागले तरी चालते. कामचुकारपणा केला तरी चालतो. त्यांना नियम नाहीत कसले. सगळे नियम एकट्या साहेबाला. तो एकटा accountable. सगळी त्याचीच जवाबदारी.



मागे एकदा राहीच्या turnament म्हणून माधवी त्याला घेऊन बाहेर गेलेली. खरंतर मला असं एकटं राहायला आवडते. कुणी जज करत नाही आपल्याला. पण मग परत कोणती तरी विचारते, ‘एकटेच राहता? मग जेवणाचे काय?’ वगैरे वगैरे आणि मग पुन्हा ते जग, आणि त्यांनी आपले रिपोर्ट कार्ड भरणे आलेच. पर्याय असता तर मी नक्की हिमालयात साधु वगैरे बनून एकटा राहिलो असतो. पण तेव्हा शिक्षण, नोकरी वगैरे च्या मागे धावलो. ते मिळाले की सुख मिळेल असे वाटायचे. लग्नाचेही तेच. चांगली नोकरी, लग्न, एक मुल असा सगळा आखीव रेखीव प्रवास झाला खरा. पण मानतील भीती, न्यूनगंड हा तसाच राहिला. आणि आता या वयात कळते आहे की नोकरी, लग्न, मुले आणि आनंद यांचा काहीही संबंध नाही. लग्न झालेले लोक दुखीही असतात आणि लग्न न झालेले सुखीह एम डी, सी इ ओ यांना झोप लागत नाही, साय्क्यात्रिक हेल्प घ्यावी लागते तर गाज्बाज्त्या रस्त्यावर झोपलेल्या माणूस दिवसा dhavlya मस्त घोरत असते? मग सुखी कोण? कोण का असेना, मी तर नाही. माझ्या मनात हे सदैव द्वंद्व चाललेले. कुणी साधासा कसा आहेस असा प्रश्न विचारला तरी तणाव येतो मला. आता सिनेमाला जायचे म्हटले तरी तणाव. आपल्याला उशीरच झाला तर. तिकीटच नाही मिळाले तर. त्या ए सी मध्ये बसूनही मलाघाम फुटत असतो. कुणी जरा बडबडले तरी त्याचा त्रास होत असतो.

पण मी लौकिक दृष्ट्या यशस्वी. मला क्लिनिकल डिप्रेशन नाही. थोडी anxiety आहे असे म्हणत डॉक्टरने अंक्सीनील नावाच्या गोळ्या दिल्या होत्या खऱ्या.



माधवीचे माहेर कडक. कसे नीट नेटके राहावे लागते तिथे. वेळेवर उठावे लागते. इथल्या सारखे दिवस भर गाऊन वर लोळणे तर शक्यच नाही. वडील आणि त्यांचे कडक नियम. म्हणूनच की काय तिला माहेरची कसलीही ओढ नाही. कायम इथेच. मग मला माझी स्पेस मिळत नाही. मी कुठे जाऊ? कसा जाऊ? मला कुठे शांतता मिळेल.

मी शंकराच्या फोटो समोर ध्यानस्थ बसलो. रात्रीची वेळ होती नाहीतर मंदिरात गेलो असतो. तसा मी रोज ऑफिसला जायच्या अगोदर मंदिरात जातो खरा. पण ते कसे धावत पळत उपचार म्हणून. एखद्या सुट्टीच्या दिवशी मी तासभर मंदिरात बसतो खरा. पण मन शांत नसते. डोक्यात सारखे विचार आणि मंदिरात सारखी येणारी माणसे मला शांतता म्हणून लाभू देत नाहीत. पण देवळात जाऊनही मला शांतता का मिळत नाही? का माझेच काही चुकते आहे? का देव बिव काही नाही. छे! छे! माझ्या मनात असा विचारही कसा येऊ शकतो? का आत जे आहे तेच बाहेर दिसते? माझे मनच अशांत म्हणून बाहेर सगळे अशांत? पण मग ह्याला उपाय काय? कसा शांत करू माझ्या मनाला?

No comments:

Post a Comment