Free for download only on 4th and 5th March 2020

Wednesday, 5 January 2022

365 Days of Self Love Day 5 throwback

 365 Days of Self Love Day 5 

तसं तर मी गेली अनेक वर्षे कंपोस्ट करत आहे. पण तरीही थोडा फार कचरा घंटा गाडीत जातच होता. मार्च २०२० पासून मात्र ओल्या कचऱ्याचा एक ही कण ह्या जेमतेम अर्धा फूट खड्याच्या बाहेर गेला नाही. द्रौपदीच्या थाळी सारखेच काहीसे. कितीही कचरा घातला तरी लेव्हल same. ह्याचा अर्थ कंपोस्ट योग्य प्रकारे बनत आहे. 

निसर्ग कचऱ्याचे ही सोने बनवतो. आपणही बनवू ना कचऱ्याचे सोने. अयोग्य विचार, अप्रिय घटना, जाणते अजाणतेपणी झालेल्या चुकांचा कचरा असतोच की आपल्या डोक्यात नी मनात. त्यातून सोन्याचे कण शोधून बनवूया का त्याचे सोने? आधी स्वीकार करायला हवा कचरा आहे याचा. मग जो हुआ सो न्याय म्हणत, ह्या क्षणात पूर्णपणे विर्घळलो तर आपसूक कचऱ्याचे विघटन होईल. 

कंपोस्ट मधे partially decomposed गोष्टी दिसतात तशा जुन्या काही घटना दिसतील, पण आता त्यांना दुःखाचा वास येणार नाही, घडून गेलेल्या गोष्टींचा त्रास होणार नाही. झालं की मग सोनं. आणि काय हवं? #365daysofselflove ,#Day5

No comments:

Post a Comment