Free for download only on 4th and 5th March 2020

Saturday, 1 January 2022

रोजचा मी वेगळा 365 Days of Self Love

 

नवीन वर्ष नवीन संकल्प. काही जण, नाके मुरडतील. म्हणतील संकल्प चार दिवसावर टिकतच नाहीत. कशाला करायचे असले संकल्प?

 पण I disagree. संकल्प हवेतच. पण ते रोज करायलाच पाहिजे हा अट्टाहास आणि त्यातून येणारा ताण, का स्वतःवर ओढून घ्यायचा?

 आपण fairly consistent असलो तरी आपण winner होतोच कि. शंभर पैकी शंभर मार्क मिळवले तरच यशस्वी अन्यथा failure असे असते का कुठे?

म्हणजे बघा, मी संकल्प केला कि मी दररोज एक तास फिरायला जाईन. पण मला दररोज जायला नाही जमले. परंतु, मी आठवड्यातले पाच दिवस, म्हणजे महिन्यातले अंदाजे २० दिवस, आणि वर्षातले अंदाजे २४० दिवस मी फिरलो, तर माझा संकल्प अयशस्वी झाला, असे म्हणायचे का? नक्कीच नाही. कधीही न फिरणारा मी वर्षातले एवढे दिवस फिरलो म्हणजे यशस्वीच कि मी.

आता मी ठरवले होते कि 365 days of self love लिहायचे.  थोडे दिवस लिहिले, मग नाही लिहिले. मग माझे सदर अयशस्वी  झाले म्हणायचे का? मुळीच नाही. ते किती जणांना स्पर्शून गेले. किती जुने मित्र पुन्हा त्या मुळे संपर्कात आले. 


 

जन्म आणि मृत्यू जसा आपल्या हातात नसतो, तसेच काही अंशी जीवन ही आपल्या हातात नसते. आयुष्यात विज्ञानाच्या equations प्रमाणे अनेक variables असतात. जितके बांधायला जाल, तितके उसवतच जाईल. कारण, रोजचा दिवस वेगळा, रोजचा मी वेगळा.

 Planing, blue prints नक्की हव्यात, पण त्या flexible असाव्यात. By the way, एक good news आहे. मी परत लिहित आहे. काय? अहो, 365 days ऑफ self love. मागच्या वेळी, ठरवून असे काही लिहिले न्हवते. ते तुम्हाला इतके भावले. जे काही लिहिले होते ते खूप personal होते. पण तुमच्या प्रतिसादाने हे दाखवून दिले कि personal असे काही नसतेच, भाव-भावना आणि त्यांचा गोंधळ हा वैश्विकच. मग भाषेचा अडसर तरी का असावा.
म्हणून आता
#365DaysofSelfLove तीन भाषेत

दर रविवारी मराठीत

दर बुधवारी इंग्लिशमध्ये, आणि

दर शनिवारी हिंदीत

 #happiness #marathi

No comments:

Post a Comment